साकेगाव येथे विद्यार्थ्यांचा सत्कार

0

भुसावळ । तालुक्यातील साकेगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, उर्दू शाळा व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांना बैलगाडीवर आणून ढोलताशांच्या गजरात गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, सरपंच आनंद ठाकरे, उपसरपंच शकिल पटेल, माजी सरपंच विजय पाटील, बाजार समिती संचालक संतोष भोळे, साबिर पटेल, अनंता सोनवणे, प्रविण पवार, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन दिलीपसिंग पाटील, संतोष लोणे, गोपाळ पाटील, वामन कचरे, मुख्याध्यापक जी.आर. चौधरी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मोतीराम जोगी, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख रिजवान आदी उपस्थित होते.