साकेगाव विकासोवर सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

0

भाजपच्या पॅनलप्रमुखांचा दारुण पराभव ; राष्ट्रवादीने उलथवली सत्ता

भुसावळ– तब्बल दहा वर्षांपासून विकासो सोसायटीवर असलेल्या निर्विवाद वर्चस्वाला राष्ट्रवादीने सुरूंग लावत साकेगाव विकोसोवर वर्चस्व मिळवले. साकेगाव, जोगलखेडा व भानखेडा विकास सोसायटीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार पॅनलला धूळ चार जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास पॅनलने 13 पैकी 9 जागा मिळवून सत्ता मिळवली. शनिवारी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सहकार पॅनलचे प्रमुख तथा भुसावळचे माजी नगरसेवक वसंत पाटील यांचा दारुण पराभव झाला.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी
साकेगाव, जोगलखेडा व भानखेडा निवडणकीसाठी शनिवारी मतदान झाले. रात्री निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित शेतकरी पॅनलचे कृष्णा भोई (212), डिगंबर आनंदा फालक (200), विजय सिताराम पाटील (202), निवृत्ती बुधो पाटील (222), केशव लक्ष्मण पाटील (210) तर भाजप पुरस्कृत सहकार पॅनलचे वामन कचरे (213), भुसावळचे नगरसेवक मुकेश पाटील (205), राजेंद्र बाबुराव पाटील (207) हे विजयी झाले. एससी- एसटी गटातून शेतकरी विकास पॅनलचे अर्जून उपासे (232), ओबीसी गटातून राखीव शेतकरी विकास पॅनलचे संतोष भोळे (226), एनटी राखीव गटातून सहकार पॅनलचे किशोर भोई (243), महिला राखीव गटातून इंदूबाई आनंदा पवार (222), शालिनी निवृत्ती पवार (240) या दोन्ही विकास पॅनलच्या उमेदवार विजयी झाल्या. शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सदस्य व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी सहकार पॅनलचे प्रमुख वसंत पाटील यांच्या गटाला केवळ चार जागा मिळवता आल्या तर पॅनलप्रमुख वसंत पाटील यांचाही दारुण पराभव झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.टी. पाटील यांनी कामकाज पाहिले.