ज्ञान उत्पन्नापेक्षा मिळवली 17 लाखांची मालमत्ता
साक्री- ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळून आल्याने साक्री पंचायत समितीचे तत्कालीन ग्रामसेवक व हल्ली धुळे जिल्हा परीषदेत कार्यान्वित कर्मचारी सतीश नानासाहेब भामरे (42, धुळे) व त्यांची पत्नी कुसूम सतीश भामरे (दोन्ही रा.प्लॉट नं.10, स्वामी सोसायटी, साक्री) यांच्याविरुद्ध साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी लोकसेवकाची धुळे एसीबीने चौकशी केली. त्यात 23 मार्च 1996 ते 31 डिसेंबर 2014 दरम्यान आरोपीने 16 लाख 90 हजार 791 रुपयांची अपसंपदा जमविल्याचे उघड झाले. या संदर्भात एसीबीचे निरीक्षक पवन देसले यांनी फिर्याद दिली तर तपासाधिकारी निरीक्षक महेश भोरटेकर यांनी उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास केला.