शिरपूर। साक्री तालुक्यातील धाडणे येथील रहिवासी बाबुद्दिन शहा यांच्या धर्मपत्नी नजबुन्निसा बाबुद्दिन शहा यांना हिप हाडांचा संधीवादचा आजार असल्याने त्यांचा शस्त्रकियेसाठी दिड लाख रु खर्च लागणार होता. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहायता निधीतून पन्नास हजार रूपयांची मदत मिळाली असून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांचा शिफारसीने व भाजपाचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी शिरपुर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहायता निधीतून पन्नास हजार रूपये मिळाले.
पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार
शिरपूर येथील भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी यांचाशी साक्री तालुक्यातील धाडणे येथील बाबुद्दिन शहा यांनी संपर्क साधला. व त्यांनी पत्नीची आजाराची परिस्थीती सांगितली. त्यांची आर्थिक परिस्थीती सर्वसाधारण असल्याने त्यांना हा खर्च करणे शक्य होत नाही असे सांगितले. यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यलयाशी पत्र व्यवहर केला.
संधीवातावर शस्त्रक्रीया
अरूण धोबी यांच्या पाठपुरव्यामूळे व भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहायता निधीतून निधी मिळाला यात हिप हाडांचा संधीवादचा शस्त्रकियेवर उपचारासाठी पन्नास हजार रूपये मंजूर झाल्याचे व जे.जे हॉस्पिटल मुंबई येथे पैसे जमा झाल्याचे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचे हस्ते बाबुद्दिन शहा यांना सत्यवचन संपर्क कार्यालय शिरपूर येथे देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी, जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, चंद्रकांत पाटील, जिल्हा कोषध्यक्ष आबा धाकड, मुबीन शेख, जिल्हा चिटणीस जाकीर तेली शहराध्यक्ष अरमान मिस्तरी, प्रशांत चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई,अविनाश शिंपी, सुनिल माळी, विक्की चौधरी, रविंद्र भोई, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दिलिप धमाणी, शहराध्यक्ष नंदू माळी, जगन पाटील, राजाराम पाटील, खलील खाटीक, दिलीप चौधरी. आदी उपस्थित होते.