साक्री । पंचायत समिती, तालुका मुख्याध्यापक संघ व तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन दहिवेल शुक्रवार 14 जुलै रोजी करण्यात आले आहे. हा मेळावा येथील कै.दे.सो.पाटील विद्यालयात घेण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रत्येक शाळेतुन इ.8 वी ते 10वीतील एक विद्यार्थी स्पर्धक पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असे आहेत नियम
या विज्ञान मेळाव्याचा विषय हा स्वच्छ भारत : विज्ञान व तंत्रज्ञानाची भुमिका शक्यता व आव्हाने असा असुन वेळ 6 मिनीटे, कोणत्याही एका भाषेत भाषण, परीक्षक दिलेल्या विषयावर 2 मिनीटापर्यंत 3 प्रश्न विचारतील. त्यापैकी किमान 2 प्रश्नांची उत्तरे अपेक्षित, स्पर्धकांसाठी भाषणापुर्वी लेखी आशय क्षमता चाचणी होईल. ही चाचणी 10 गुणांची असणार आहे. चार्ट व पोस्टर्स विद्यार्थ्यांनीच तयार केलेले असावेत. भाषणाच्या वेळी त्याचा वापर अपेक्षित. चार्ट व पोस्टर्सची साईज 850 मिमी रुंद व 600 मिमी उंच असावेत. त्याचा कॅलेंडरप्रमाणे व्हावा. तालुकापातळीवरुन दोन विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता करण्यात येणार आहे. तरी आपल्या विद्यालयातून इ.8 वी ते 10 वीपर्यंतचा एकच विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकासह पाठवावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी बी.बी.भिल, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बी.डी.देसले, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पी.झेड.कुवर , संयोजक मुख्याध्यापक ए.डी.बच्छाव व विज्ञान मंडळाचे सचिव के.एस बच्छाव यांनी केले आहे.