निजामपुर । शासनातर्फे नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्यात येत आहेत. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावण राज्य सेवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना यांचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून साक्रीय तालुक्यात संजय गांधी योजना समिती गठीत न झाल्याने या योजनेची बैठकच झालेली नाही. बैठकी अभावी अनेक विधवा महिला, अपंग, जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येत नसल्याचे समोर येत आहे.
ऑनलाईन फॉर्मबाबत संभ्रम
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंर्गत निराधार व्यक्ती, अपंग, जेष्ठ नागरिक यांचा समावेश आहे. परंतु अनेक निराधार लोकांनी व महिलांनी पगार (अनुदान ) साठी प्रस्ताव सादर केला आहेत. समिती गठीत झाल्या नसल्याने संबंधित अधिकारी यांना गेल्या अनेक महिन्यांपासुन संजय गांधी योजनेची बैठक झालेली नाही. यामुळे अनेक प्रकरण प्रलंबित पडले आहे. संजय गांधी योजना व इंदिरा गांधी योजनेअंतर्गत ऑन लाईन फॉर्म भरण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. परंतु या योजनेतील लाभार्थी अशिक्षीत असल्याने त्यांना इंटरनेट सेवा कशी वापरून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे कळत नाही. तसेच इंटरनेट कॅफेमध्ये गेल्यास साइट माहित नसल्याने तेथेही त्यांना फॉर्म भरून मिळत नाही. याचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.