निजामपुर । मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी होत असलेल्या क्रांतीमोर्चात जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी सहभागी करावे, यासाठी साक्री तालुका मराठा क्रांती मोर्चाची कोअर कमेटीची बैठक घेण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज साताराचे खासदार छत्रपती उदययनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी मोर्चाचे व सकल मराठा समाजाचे नेर्तत्त्व करावे असा ठराव मंजूर करण्यात आला.
यादिवशी सकाळी तालुकाभरातुन मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचे बैठकस्थळी रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. साक्री तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन साक्री मराठा क्रांती मोर्चा समितीने केले आहे.
राजे लॉन्सला बैठक
मराठा क्रांती मोर्चा साक्री तालुका कोअर कमेटीने 3ऑगस्टपासुन विविध गावात बैठक घेऊन प्रचार व प्रसार करावा. निजामपुर, पिंपळनेर, दहिवेल, मालपुर कासारे, छडवेल , महसदी माळमाथा व काटवान भागात समाज बांधवांनी देखील सहभागी व्हायचे आहे. तसेच साक्री तालुक्यातील सर्व मराठा समाजबांधवांनी 6 ऑगस्ट 6 वाजता साक्री येथील राजे लॉन्स मंगल कार्यालयात नियोजन बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.