साक्री : पिंपळनेर येथील अल्पवयीन तरुणीला फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला टक करण्यात आली. लितेश उर्फ नित्या भरत पवार (21, पिंपळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीताने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत नाशिक येथे अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी नितेश पवार याच्याविरोधात भांदवि कलम 363 व वाढीव कलम 376 (1) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नितेश पवार यास अटक केली आहे. तपास उपनिरीक्षक पी.पी.सोनवणे हे करीत आहेत.