साक्री तालुक्यात कामांच्या प्रगती होत नसल्याने नाराजी

0

साक्री । साक्री पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण भागात शासनाच्या योजना पुरविण्यासाठी ग्रामसेवकाची नियुक्ती केलेली आहे. ग्रामसेवक जनतेपर्यंत शासनाच्या योजना व माहिती देत नसल्यामुळे साक्री तालुक्याच्या कामांच्या प्रगती होत नसल्याने नाराजी व्यक्त केली. साक्री तालुक्यातील खेड्यातील लोकसहभागातून विकासकामे करून घेण्यासाठी ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकार्‍यांनी गावात राहून योजनांची माहिती देऊन शासकीय योजनांचा फायदा सामान्य नागरिकांपर्यंत पेाहेचवले पाहिजे त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही मात्र कामाची प्रगती झाली पाहिजे. जर एखाद्या ग्रामसेवकाने योजना व्यवस्थित राबविली नाही आणि त्याची खोटी माहिती दिल्यास संबंधीतांविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. या अगोदर कामे झाली किंवा नाही त्याच्या मागे न लागता यापुढे काम करून दाखवायची आहेत.

पंचायत समितीच्या सभागृहात बैठक
पंचायत समितीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, गटशिक्षणाधिकारी बी.बी.भिल, उपविभागीय बांधकाम अभियंता धिवरे, तसेच विविध विभागप्रमुख, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. स्वच्छता अभियान-शौचालय, ग्रामीण हमी रोजगार योजना, रमाई योजना, इंदिरा आवास योजना, शबरी योजना, जलयुक्त शिवार, शेततळे यांची कामे 31 मे पर्यंत पूर्ण झाली पाहिजेत. 14 वित्त आयोगाच्या निधीतून शौचालय बांधकाम एका आठवड्यात पूर्ण केली नाही तर पुढील निधी देण्यास बंद करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरण देवराजन यांनी सांगितले. ‘साक्री पंचायत समिती आवार असामाजिक तत्वांचा अड्डा’ या मथळ्याखाली ‘जनशक्ति’ वृत्तपत्राने छापलेल्या वृत्ताची दखल जिल्हा पातळीवर घेऊन देवराजन यांनी बैठक घेऊन परिसराची पाहणी केली. भिंतीमध्ये खड्डे पाडून आवारात विविध उपक्रम चालत होते ते आता बंद होणार आहे.