धुळे । साक्री तालुक्यातील छाईल नाडसे शिवारात दगडी माळ शाळेजवळ 19 जानेवारी रोजी दिनेश देसले (रा. कासारे) यांच्या गायीच्या वासरावर हल्ला केला. मात्र जवळच आश्रय घेतलेल्या दिनेश देसले यांनी बॅटरीचा प्रकाश चमकवल्याने बिबट्या तेथून पसार झाला. दरम्यान 16 जानेवारी रोजी देखील बिबट्याने 2 कुत्र्यावर हल्ला करून त्यांची शिकार केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात गाई म्हशी शेतात बांधलेल्या असतात, परिणामी तेथील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धुळे वन विभागाला येथील नागरिकांनि कळवले असता वन विभाग प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे.