साक्री । तालुक्यातील म्हसदी येथील गंगामाता कन्या विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून प्रेरणा नेरकर 92 टक्के गुण मिळवून केंद्रात द्वितीय तर विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सुप्रिया अरूण शिंदे 90.80 टक्के विद्यालयात द्वितीय, तर मृगनयनी अभिमन्यू बेडसे 90.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यशस्वी विद्यार्थीनींना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.व्ही.एन.देवरे, एन.ए देवरे, एम.एन.भामरे, के.एस.चव्हाण, आर.एस.पाटील, सी.व्ही.नांद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
साक्रीची अपेक्षा चंदनशिव 90 टक्के गुणांनी उत्तीर्ण
येथील ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी नवनाथ व मिना चंदनशिव यांची कन्या अपेक्षा चंदनशिव ही गुडशेफर्ड इंग्लिश मेडीयम स्कुलची विद्यार्थी 90 टक्के गुण मिळवून वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ककाणी विद्यालयाचा निकाल 86 टक्के
तालुक्यातील ककाणी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील दिव्या शिवाजी देवरे हिने 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर कावेरी दादाजी देसले हिने 79.40 टक्क तर प्रतिक्षा छगन सोनवणे हिने 77.60 टक्ेक गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ सोनवणे, मुख्याध्यापक एस.एस.हयाळीज, व्ही.आय.कुवर, भटू वाणी, एस.बी.मराठे, एम.एम.देवरे, जी.एम.मरवर, के.व्ही.देवरे, पी.डी.शेवाळे, बी.आर.सोनवणे, एन.डी.शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.