साक्री । साक्री पंचायत समितीच्या आवारात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरले असून तालुक्याच्या विकासाच्या योजना ज्या ठिकाणातून राबविले जाते अशा पंचायत समितीचाच विकास अंधारात सापडले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात अंधार पसरलेले आहे. साक्री पंचायत समितीच्या आवारात शासकीय कार्यालय आहेत. त्यात भूमि अभिलेख कार्यालय, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, शिक्षण विभाग, रेकॉर्ड ऑफीस, शासकीय कर्मचारी भवन आदी कार्यालय आवारात असून या ठिकाणी जुने रेकॉर्ड आहे. धुळे जिल्ह्यात काही शासकीय कार्यालयांना भरदिवसा आग लागली आहे. तसाच प्रकार साक्री शहरात रात्री-अपरात्री होऊ शकतो. साक्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पंचायत समितीच्या चारही बाजुने कंपाऊंड केले आहे. सिमेंटच्या वाल कंपाऊंड काही ठिकाणी भिंत तोडून टाकले आहे.
परिसरात अंधाराचे साम्राज्य
नागरी वसाहतमध्ये असलेल्या पंचायत समितीच्या आवारात नेहमीच असामाजिक तत्वांचा वावर असतो. दारूबंदी, गुटखाबंदी केले असून काही दारूडे या आवारातील कार्यालयांच्या ओट्यावर बसून दारू पित असतात. त्यामुळे आवारात बर्याच ठिकाणी दारूच्या बाटल्या फेकलेल्या आढळून येत आहेत. तर काही नागरीक या आवारात शौचालय करण्यासाठी या भिंतीच्या मधून खड्डे पाडून रस्ता तयार केला आहे. पंचायत समितीच्या आवारात ठिकठिकाणी विद्युत खांबे आहेत. त्यांच्यावर असलेले पथदिवे बंद पडलेले आहेत. ती दुरूस्ती केली जात नाही, त्यामुहे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अंधाराचा फायदा घेत तरूण याठिकाणी विविध उद्योग करत आहेत. त्यामुळे मोठा अनुचित प्रकार घडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. कार्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून या ठिकाणी पथदिवे बसवण्याची गरज आहे. शासकीय कार्यालयात दिवसाला मोठ्या प्रमाणात कर्मचारी संख्या असते मात्र रात्रपाळीला एकही कर्मचारी या कार्यालयाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले दिसून येत नाही. खाजगी व्यक्तीच्या जबाबदारीवर सर्व कार्यालयाची सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली असून एकच व्यक्त सर्व कार्यालयांची सुरक्षा कसा करणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होते.