साक्री । साक्री, पिंपळनेर रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडली असुन रस्ता दुरूस्त करण्याची मागणी वाहनधारकान मधून होत आहे. साक्री तालुक्यातील कासारे फाट्याजवळ पिंपळनेरकडे जाणार्या रस्त्यावर मोठी खडडे पडली आहेत. या खड्ड्यांमधून अनेक वाहने आदळली जात आहेत. त्यामुळे अनेक वाहनांची टायर फुटून अपघात होण्याचा प्रकार नित्याचा झाला आहे. काही दिवसापूर्वी मोटार सायकल व इंडिका कार यांचा अपघात झाला होता. धाडणे फाट्याजवळ खडडे टाळण्याच्या नादात दुचाकीवरील दोन तरूणांना आपला जीव गमवावा लागला. याअपघातात पिक अप वाहनने पेट घेतला होता. तरी पिंपळनेर रस्त्यावर पडलेली खडडे बुजवण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांन मधून होत आहे. पिंपळनेर कडे जाणारी लहान मोठी वाहने रोज ये-जा करीत असतात.
वाहनधारकांना विविध आजार
वाहनधारकांना खड्यांतुनच प्रवास करावा लागत आहे. खड्डयातून वाहन चालवत नेल्याने वाहनचालकांना पाठ दुखी, कंबर दुखी सारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. या खड्ड्यांतून मार्ग काढ असतांना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण पाहता रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे अशी चर्चा वाहनचालकांमध्ये ऐकवयास मिळत आहे. खड्डयांमुळे जीवत हानी झालेली असतांना प्रशासन खड्डे दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. या खड्ड्यांमध्ये अनेक वाहने नादुरूस्त होऊन पडतात. अनेक वषार्ंपासुन या रस्त्याची दुरूस्ती केली जात नसल्याचे वाहनधारकानमधुन बोलले जात आहे.