साक्री-पुणे रातराणी बसचे बुकींग थांबल्यानं प्रवासी संतप्त

0

नादुरुस्त मशीनमुळे एसटी थांबली रस्त्यावर; दुसर्‍या मशीननंतर बस पुण्याकडे रवाना

साक्री- साक्री आगारातून सुटणार्‍या गुरुवारी रात्री आठ वाजता साक्री-पुणे एसटी बसचे तिकीट काढण्याचे मशीन नादुरुस्त झाल्याने बस साक्री शहरातील तहसील कार्यालयासमोर काही वेळ थांबल्याने प्रवासी संतप्त झाले. उन्हाळी सुट्टी असल्याने प्रवाशांची आधीच गर्दी एसटी बसमध्ये असताना तिकीट बुकींग थांबल्याने प्रवासी संतप्त झाले. आधीच वाढलेला उकाड्याने प्रवासी घामाघूम झाले असताना काही तासानंतर साक्री-पुणे बसचे मशीन नादुरुस्त मशीननंतर दुसरे मशीन मागविण्यात आल्यानंता बस पुण्याकडे मार्गस्थ झाले.