साक्री पोलिसांनी गुटखा घेवून जाणार्‍यास केली अटक

0

साक्री । शहरातील दुचाकीवर विमल गुटखा दुकानावर घेवून जाणर्‍या विक्रेत्याला साक्री पोलीसांना रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. साक्री शहरात अंबापुरा रस्त्याकडून गुटखा विके्रता सुमित कंकारिया याला साक्री पोलीसांनी विमल गुटखा घेवून जात असतांना गोपनीय माहितीवर पकडले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक डी.जी. पाटील, पोलीस कॉस्टेंबल एल.जी. वाघ, गुलाब वसावे, तारासिंग पावारा, विजय पाटील, ज्ञानेश्वर भालेराव यांनी सायंकाळी 8 वाजेला आंबापुर रोडवर पाळत ठेवली होती.

विमला गुटखा दुकानावर मोटर सायकलीवर घेवून जात असतांना पोलीसांनी त्याला हटकले असता सुमित याने घाबरून विमल घुटका असल्याचे सांगितले. याबाबत औषध प्रशासन विभागात कळवून साक्री पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.