धुळे । उंभर्टी येथील तरूणींवर अत्याचार करणार्या नराधामांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रदेश महिला काँग्रेसतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुळवते यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात कोपर्डी, तीखी, पाथर्डी सारख्या बलात्कार व इतर त्यासारख्या घटना ताज्या असतांना धुळे जिल्ह्यांतील साक्री तालुक्यात उंभर्टी येथे 22 वर्षींय तरूणीवर सहा नराधामांनी तिच्यावर सामुहीक अत्याचार केला. ही घटना उघडकीस येवू नये यासाठी सेवानिवृत्त पोलिस पाटलाने प्रयत्न केले. परंतु, पोलीसांनी सतर्कता दाखवत सहा पैंकी पाच नराधामांना पकडले आहे. तरूणींवरील असे अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी सरकारने व प्रशासानने कठोर पावले उचलणे गरजेचे असतांना सरकार यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उंभर्टीच्या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सल्लागार विमल बेडसे, प्रदेश महिला सरचिटणीस प्रभादेवी परदेशी, युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश काटे, जिल्हाध्यक्ष गायत्री जैस्वाल, बानु शिरसाठ, आलोक रघुवंशी, मसुद सरदार, सुरेखा बडगुजर, रूपा त्रिवेदी, मालती बोळे, रेखा सोनवणे, जावेद शाह, योगेश विभुते, अबुलास खान, डॉ. कैलास सोनवणे, रिदवान अन्सारी, दादा करपे, मोहसिन तांबोली, नाजनिन शेख, तौसिफ खाटीक यांच्यासोबत महीला व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.