साक्री । शहरातील बसस्थानकात मोटरसायकलीला कट लागल्याच्या कारणावरून बस ड्राईव्हरला मारहाण करण्यात आली. यावेळी बसस्थानकातील युनीयनच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून ड्रायव्हरला सोडविले. मारहाण झाल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी बसचा चक्काजाम आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी बसस्थानकात धाव घेतली. वापी-जळगाव बस एमएच 20-3396 बसस्थानकात प्रवेश केल्यानंतर बस वरील ड्रायव्हर श्रीकृष्ण पाटीलला खाली उतरूण मारण्याचा प्रयत्न सुरू झाला. यावेळी मारहाण करणार्याला युनियनच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या हवाली केले. अशाच प्रकारच्या घटनांमुळे चक्काजाम झाल्याने प्रवाशांचे हाल होतात. यामुळे इतर प्रवाशांसाठी साक्री तालुका संघटक पंकज मराठे, जिल्हा उपप्रमुख भुपेश शहा यांनी प्रवाशांची बाजू मांडत चक्काजाम आंदोलन मागे घेण्याची विनंती युनियनच्या कार्यकर्त्यांना केली. मात्र युनियन कार्यकर्ते व शिवसेना कार्यकर्ते एकमेकांची बाजू मांडतांना शाब्दीक चकमक झाली. यावेळी पोलिस अधिक्षक अभिषेक पाटील झाल्यानंतर दोघांची समजूत काढून आंदोलन मिटविण्याची सूचना देवून वातावरण पूर्ववत केले.