साक्री । तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांच्या तोंडाचे पाणी पळाल्याचे चित्र निर्माण झाले होते. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाने पुरागमन केले आहे. यातच पोळा सण असल्याने शेतकर्यांच्या आनंद द्विगणीत झाला आहे.
साक्री शहरात पोळा चौक येथे पोळा असल्याने बैलांना सजवून आणण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता बैलांची मिरवणूक काढण्यात आली. शेतकर्यांनी वर्षभर शेतात राबणार्या व शेतीत मदत करणार्या आपल्या सर्जाराजाच्या जोडीचे सपत्नीक पुजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवद्य देवून पोळा सण साजरा केला.