साक्री येथे मासे वाहतूक करणारा ट्रक उलटला

0

साक्री । मासे वाहतूक करणारा एक ट्रक आज सकाळी महामार्गावर उलटला. यावेळी अपघातग्रस्त टक्रचालकासह क्लिनरला मदत करण्याऐवजी ट्रकमधील मासे चोरुन नेण्यावर नागरीकांनी भर दिल्याने तसेच माश्यांचा ट्रक उलटल्याची खबर क्षणार्धात वार्‍यासारखी पसरल्याने लूटारुंची गर्दी झाली होती. अखेरीस पोलिसांनीघटनास्थळी धाव घेत ही ूटमार रोखली. मात्र तो पावेतो अनेकांनी मासे पळविले होते. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार गुजरातमधील वापी दमन येथून मासे घेवून जाणारा डब्लू बी 23/डी 3814 हा ट्रक विमलबाई कॉलेजजवळ अपघात होवून उलटला. यावेळी ट्रकमधील मासे भरलेले बॉक्स रस्त्यावर फेकले गेले. क्षणात ही खबर शहरात पसरल्याने अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतली.

शर्टाच्या खिशात भरले मासे
यावेळी ट्रकचालक किंवा क्लिनरची चौकशी करण्याऐवजी नागरीकांनी रस्त्यावर पडलेले मासे पळविण्यास प्राधान्य दिले. अनेकांनी खिशातील हातरुमालासह प्लास्टिक पशव्या तर काहींनी अंगातील शर्ट काढून त्यात मासे भरीत ते पळविण्याला प्राधान्य दिले. दरम्यान या अपघाताची खबर पोलिसांना मिळाल्याने ते ही घटनास्थळी दाखल झाले. मात्र तो पावेतो अनेकांनी मासे लांबविले होते. विशेष म्हणजे आज दुपारपासून कार्तिक पौर्णिमा लागत असली तरी फुकटात मिळणारे मासे चोरुन नेण्यावर भर देण्यात आल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला तर क्लिनर ट्रकमधील माल सावरतांना दिसून आला.