साक्री विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी मोहिते

0

धुळेे । भारिप बहुजन महासंघाची गुरुवारी बैठक बोलाविण्यात आली होती. रात जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव, नानासाहेब वाघ, आर.डी.साळवे, मिलिंद वाघ, रविंद्र आहिरे, युवराज ठाकरे, नामदेवराव पिंपळे, गुलाब जगदेव, रविंद्र जाधव, प्रविण सोनोने आदींच्या उपस्थितीत कमलाकर मोहिते यांची साक्री विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी निवड करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी विनोद लोेटन वाघ, निलेश गायकवाड, शहराध्यक्षपदी सतिष मोहिते, रविंद्र सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्रकारीणीची निवड
भारिपचे जिल्हाध्यक्ष यांनी नविन आलेल्या पदाधिकार्यांना तालुका बांधणी करण्याचे व गाव तेथे शाखा उभारणी करुन बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचे विचार आणि पक्षाचे ध्येयधोरण जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहराध्यक्ष योगेश बेडसे, जिल्हाउपाध्यक्ष मिलिंद वाघ, नानासाहेब वाघ, आर.डी.साळवे साहेब, एकलव्य संघटनेचे युवराज ठाकरे, गौतम बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंजि. प्रवीण सोनोने यांनी केले. सदर कार्यक्रमामध्ये अविनाश वाघ, गौतम खरे, गौतम इंदी, सागर मोरे, विनाद वाघ, हेमंत वाघ, गोपाल सूर्यवंशी, सागर वाघ, कल्पेश बैसाणे, कुणाल साळवे, देवानंद मोरे, निलेश गायकवाड, सचिन बच्छाव, अजय सूर्यवंशी, हेमंत वाघ, अविनाश मोरे, रत्नाकर वाघ, हर्षल घोलप, मुरलीधर सोनवणे, मुकेश वाघ, भटू सोनवणे, ऋषिकेश वेद्रें, सिध्दार्थ साळवे, नागेश बोराळे, तेजस सोनवणे, मनोज पेढारकर आदी उपस्थित होते.