साक्री, शिंदखेडा आगार बसला बळसाणे येथे थांबा द्या

0

धुळे । साक्री व शिंदखेडा आगार प्रमुखांना बळसाणेच्या बसस्थानकावर बस थांबविण्याच्या सूचना देण्याची विनंती बळसाणे येथील शिवसेना उपविभागीय प्रमुख महावीर जैन यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ व्यवस्थापक राजेंद्र देवरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या दोन महिन्यापासून बळसाणे येथील गाव बसस्थानकावर साक्री व शिंदखेडा आगाराचे बस थांबत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गाव बसस्थानकापासून 80 ते 90 मिटरच्या अंतरावर थांबत असल्याने प्रवशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात प्रवासी शेड नसल्याने प्रवाश्यांना पावसात भिजत बसची वाट पहावी लागत असते. याचा त्रास ज्येष्ठ नागरिक व महिलांना सहन करावा लागत आहे.