साक्षीने सत्यव्रताला टिपले !

0

नवी दिल्ली । भारताची पहिली कुस्तीपटू जीने ऑलिम्पिक पदक जिकले होते.ते सध्या आपल्या कुश्तीच्या आखाड्यातून बाहेर असून ती येत्या 2 एप्रिलला विवाहच्या आखाड्याला सुरवात होणार आहे.साक्षी मलिक हिचा विवाह आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियान याच्या सोबत होत आहे.याबद्दल तीने मागेच फेसबुक दोन्ही जणांच्या फोटोसोबत आपल्या लग्नाची तारिख सुध्दा जाहिर केली होती. यामुळे येत्या काळात साक्षी मलिक ही आपल्याला कुस्तीच्या फडात न दिसता घरातील फडात दिसणार आहे.दोघांचा प्रेमविवाह जरी असला तरी तो अ‍ॅरेज मॅरेज होत आहे.कुश्तीच्या आखाड्यात साक्षीचे प्रेम जुळले होते आणि प्रेमाचा आखाड्यातून आता ते विवाहच्या आखाड्यात जात आहे.

16 ऑक्टोबरला झाला साखरपुडा
गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी दोघांचा साखरपुडा झाला होता. साक्षी आणि सत्यव्रत यांची प्रेमकहाणी तशी खूप आधीपासून सुरू होती. आखाड्यात कुस्तीचे धडे घेता घेता साक्षी सत्यव्रतच्या प्रेमात पडली होती. साक्षीपेक्षा एका वर्षाने लहान असलेला सत्यव्रत हरियाणाच्या रोहतकमध्ये आखाडा चालवणा़र्‍या कुस्तीपटू सत्यवान यांचा मुलगा आहे. सत्यवान यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सत्यवान यांच्या आखाड्यातच साक्षी आणि सत्यव्रत यांची ओळख झाली होती.

2016 ऑलिम्पिक साक्षीला रेपचेज नियमानुसार कॉस्य पदक मिळविले होते. या कुश्तीच्या वेळी साक्षी सुरवातीला 5-0 ने मागे होती. पुन्हा कुश्तीत जोरदार वापसी करित तीने शेवटी 7-5 ने हा कुश्तीचा फड जिकला होता.शेवटच्या काही सेकंदात साक्षीने दोन गुण मिळवून हा फड जिकला होता.प्रतिद्वदी ने या निर्णयावर आक्षेप घेतला मात्र तरीही पंचानी आपला निर्णय कायम ठेवल्यामुळे आक्षेप चुकीचे ठरल्याने एक गुण साक्षीच्या खात्यात गेला.त्यामुळे 8-5 च्या फरकाने तीने हा फड जिकला. 2016 मधील ऑलिम्पिक मध्ये भारताला मिळालेले पहिले पदक होते.

प्रेमाचे रुपांतर विवाहात
रिऑ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता साक्षी मलिक 2 एप्रिल पासून जीवनाच्या आखाडा सुरू होणार आहे. गेल्याच वर्षी साक्षीने लवकरच आपण विवाह करणार असल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. पण त्यावेळी साक्षीने आपल्या होणा़र्‍या ‘अहों’चे नाव जाहीर केले नव्हते. अखेर साक्षी आणि सत्यव्रत यांनी आपल्या लग्नाची तारीख आपल्या फेसबुक पेजवर सत्यव्रतसोबतचा एक फोटो पोस्ट करून लग्नाची माहिती दिली. येत्या 2 एप्रिलला दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नपत्रिका देखील वाटून झाल्याची माहिती खुद्द साक्षीने दिली आहे. साक्षीलच्या लग्न सोहळ्यात क्रीडा क्षेत्रासह राजकीय इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. साक्षी तिच्या लग्नात सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर सब्यासची मुखर्जी तिचा ड्रेस डिझाईन करणार आहे.