साखरपुड्यासाठी आले अन् लग्न लाऊनच गेले

0

भडगाव । येथील माळी समाजात रविवारी एका शिस्तबद्ध साखरपुड्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र धकाधकीच्या जीवनात ऐनवेळी सर्वांची समंती घेवून साखरपुड्यातच एक आदर्श विवाह पार पडला. येथील ओम इलेक्ट्रीकल्सचे संचालक शिवदास आप्पा महाजन हे सामाजिक कार्यकर्ते असुन माळी समाजातील खान्देश माळी महासंघाचे काम पाहतात त्यांची ज्येष्ठ कन्या हिचेशिक्षण एमएस्सी झाले असुन हिचा विवाहयोग मुळचे मेथी.ता.शिंदखेडा जि.धुळे येथील रहिवासी बापुराव माळी यांचा मोठा मुलगा मनोहर यांच्याशी जुळून आला. त्यानिमीत्त प्रेमापोटी मुलीचा मोठ्या थाटात साखरपुडा करण्याची इच्छा मुलीच्या परिवाराची होती. पण मान्यवरांच्या मध्यस्थीन साखरपुड्यासाठी आलेल्या नवरदेवच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडल्याने समाजात एक आदर्शनिर्माण केला आहे.

माळी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली मध्यस्थी
रविवार 5 रोजी नियोजित साखरपुडा अकरा वाजता सुरू झाला. त्यानंतर जेवण असा कार्यक्रम असतांनाच विविहास मध्यस्थी असेलेले धुळे येथील प्रा. बोरसे सर, खान्देश माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश महाजन, प्रदेश सचिव वसंत पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, नगरसेवक अमोल नाना पाटील, ज्येष्ठ समाजसेवक निंबा महाजन, महाराष्ट्र माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन महाजन यांनी ऐनवेळी साखरपुड्यातच लग्न समारंभाचा निर्णय घेतला. त्याचा सामाजिक फायदा वधु वर पित्याला लक्षात आणुन देऊन सर्वांच्या संमतीने भव्य अशा साखरपुड्यातच सायंकाळी विवाह सोहळा पार पडला. यावेळी खान्देश माळी महासंघातर्फे नवरदेव व नवरी यांना मदत केली.

विवाह सोहळ्यास यांची उपस्थिती
या आदर्श विवाह सोहळ्यास भडगाव-पाचोरा चे आमदार किशोर पाटील, पाचोराचे नगरसेवक अमोल शिंदे, भा.ज.पा. तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, प्रदीप पवार, नगरसेवक अतुल पाटिल, सुभाष पाटील, संतोष महाजन, श्याम पाटील, महेंद्र ततार, मनोहर चौधरी, शंकर मारवाडी, सचिन चोरडिया, परशुराम पेंटर यांच्यासह मुला-मुलीकडील नातेवाईक, मित्रमंडळी या आदर्शविवाह सोहोळ्यात सहभागी होते. समाजाने अश्याच पद्धतीने आपले लग्नकार्य पार पाडावे व अशी अपेक्षा यावेळी सुज्ञांकडुन व्यक्तकरण्यात आली.