रावेर । मामाच्या साखरपुड्यास जाणार्या तालुक्यातील अंधळमळी येथील बालक कुंभारखेडा गावाजवळ ट्रकचा एक्सल तुटल्याने अपघात झाल्याने जागीच ठार झाला तर सुमारे 25 जण जखमी झाल्याची घटना 12 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परीसरातील व साखरपुड्यास जाणार्या व्यक्तींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
ट्रकचा एक्सल तुटल्याने झाला अपघात
तालुक्यातील लोहारा येथील फिका तडवी या तरुणाचा साखरपुडा यावल तालुक्यातील मोरव्हद येथे होता. सकाळपासुन नातेवाईक लोहारा येथे जमा झाले होते. यामध्ये सर्व वर्हाडी बसून निघाले होते. ट्रक कुंभारखेडा ते सावखेडा दरम्यान 1.30 वाजेच्या सुमारास ट्रकचा एक्सल तुटुन बाजूला असलेल्या सागाच्या झाडाला आढळला. यामध्ये समीर अब्जल तडवी (वय 11) हा जागीच ठार झाला. तर इतर 25 वर्हाडी जखमी झाले आहे. लगेच काही नागरिकांनी जखमींना लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर इतरांना फैजपुर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. ट्रक अपघात होताच परीसरात असलेले नागरीक तात्काळ जमा झाले. या घटनेमुळे परीसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. मयत समीर तड़वी हा पाल येथील एका शाळेत होता मामाचा साखरपुडा असल्याने नुकताच लोहार्यात आला होता. हसत-खेळत ट्रकात बसून सर्वजण साखरपुडयाला निघाले. परंतु एक्सल तुटून अपघाताची बातमी अपघाताची बातमी पसरताच अंधळमळी, लोहारा आणि मोरव्हद येथे हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारच्या अपघाताची बातमी कळताच माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक आसिफ मोहोम्मद, भास्कर पहेलवान, शफी शेख आदिनीं ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेऊन मयत यांच्या नातलक यांचे सांत्वत केले.