सागर पार्कवर जॉगिंग ट्रॅक

0

जळगाव । महापालिकेची मालकी असलेल्या सागरर्पाकवर लवकरच जॉगिंग पार्क तयार करण्यात येणार आहे. तसेच या मैदानाला संरक्षक भिंत बांधून आतमध्ये हायमस्ट लँम्प व फ्लॉवर बेटसह चौफेर वृक्षरोपण करण्यात येणार असल्याची माहीती महापौर नितिन लढ्ढा यांनी दिली. उद्या मंगळवारी होणार्‍या महासभेत आयत्यावेळी हा विषय घेण्यात येणार आहे. जळगाव शहरातील सारग पार्क मैदानाच्या मालकीबाबत सवोच्च कोर्टाने निकाल दिला. त्यात सागर पार्कची मालकी जळगाव महापालिकेची असल्याचे स्पष्ट झाले आहे. सागर पार्कवर सिवीक सेंटरचे आरक्षण असले तरी त्याचा विकास लगेच करणे शक्य नाही. त्यामुळे तोपर्यंत ही जागा सुरक्षित राहवी वृध्द पुरुष महीला यांना त्यावर फिरता यावे यासाठी येथे चौफेर बाजूने जागिंग ट्रॅक तयार करण्यात येणार असल्याची माहीती महापौर लढ्ढा यांनी दिली.या ठिकाणी मैदानाच्या चौफेर शेजारी शेजारी दोन ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. एक ट्रॅक पेव्हर ब्लॉक असलेला पक्का तर दुसरा हा मातीचा कच्चा जागिंग ट्रॅक तयार करण्यात येणार आहे.