यावल वनविभागाच्या गस्ती पथकाची कारवाई
यावल– सागवान लाकडाची अवैधरित्या सायकलीद्वारे वाहतूक होत असतांना यावल वनविभागाच्या फिरत्या गस्त पथकाने चार सायकलस्वारांकडून 28 हजार 500 रुपये किंमतीचे सागवान जप्त केले. अंधाराचा फायदा घेत सायकलस्वार सायकल सोडून पसार झाले. ही कारवाई मंगळवारी पहाटे यावल शहरातील सुतगिरणीमागे करण्यात आली. कारवाई वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, वनरक्षक जगदीश ठाकरे, एस.एस.माळी, एस.टी.पंडीत, वाय.डी.तेली यांनी केली.