जळगाव । बळीराम पेठ परिसरातील साजन मार्केटजवळ शनिवारी रात्री धिंगाणा घालणार्या दोन मद्यपींना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली. दरम्यान, रात्री त्यांच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी रमजान सणानिमित्त शहरात पेट्रोलिंगचे करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहे. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी मोहसिन बिरासदार व दिपक सोनवणे यांचे पथक शनिवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास बळीरामपेठ परिसरातील साजन मार्केटजवळ पेट्रोलिंग करत असतांना त्यांना अश्विन सुरेश भोळे (वय-32), बिपीन दिपक पवार (वय-30, दोन्ही रा. बळीराम पेठ) हे दोघे दारूच्या नशेत धिंगाणा घालतांना मिळून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली. यानंतर पोलिस कर्मचारी मोहसिन बिरासदार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.