साजिद खानचं महिलांप्रती वर्तन किळसवाणं असतं- दिया मिर्झा

0

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झाने साजिद खानच्या ‘हे बेबी’ चित्रपटात एक लहानशी भूमिका साकारली होती. त्यावेळीदेखील साजिदचं वागणं खूपच अस्वस्थ करणार होतं, असं दियाने एका मुलाखती सांगितले. ‘साजिद खानबद्दल गेल्या काही दिवसांपासून मी ज्या बातम्या ऐकत आहे त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्याचं वागणं हे किळसवाणं असतं. त्याच्यावर जे काही आरोप करण्यात आले आहेत, आणि पीडित महिलांनी जे अनुभव सांगितले आहेत ते खूपच धक्कादायक आहेत. सुदैवानं मला इतका वाईट अनुभव आला नाही. साजिदचं महिलांप्रती वागणं घृणास्पद आहेच पण तो इतका वाईट वागू शकतो याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.’ असं म्हणत दियानं साजिदच्या वागण्यावर आपली नाराजी दर्शवली आहे.

‘मी साजिदसारख्या लोकांपासून नेहमीच लांब राहते अशा माणसांसोबत कोणतंही नातं ठेवायला मला आवडत नाही, असंही ती म्हणाली.