साठे, टिळकांच्या जीवन कार्यास उजाळा

0

जळगाव । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त भगीरथ इंग्लिश स्कूल येथे रविवारी कविसंमेलन झाले. देशभक्ती वृध्दींगत व्हावी व सामाजिक समस्यांना वाचा फोडावी या उद्देशाने समाज चिंतामणी प्रतिष्ठान बहुउद्देशिय संस्थेतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी, साहित्यिक, कवी अशोक कोतवाल, भास्कर चव्हाण, प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेतर्फे सामाजिक व देशभक्ती या विषयावर काव्यलेखन स्पर्धासुध्दा आयोजित करण्यात आली होती. त्यातील विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देवून गौरविण्यात आले.

या कवींनी केले सादरीकरण
अरुण वांद्रे, सुना पाटील, मीना सैंदाणे, गोविंद पाटील, एन.आर.पाटील, दिलीप चौधरी, अशोक पारधे, प्रकाश महाजन, विशाल शर्मा, निवृत्तीनाथ कोळी, पुष्पलता कोळी, ज्ञानदेव अत्तरदे, चंद्रकांत चव्हाण, भीमराव सोनवणे, भास्करराव चव्हाण, बापुराव वाकलकर, मोहन भदादे, बी.झेड. पाटील, मनोहर तेजवाणी, आर.जे.सुरवाडे, किशोर नेवे, धनराज सोनवणे यांच्यासह प्रमुख अतिथी अशोक कोतवाल व कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान भटकर यांनीही कविता सादर केल्या. सुत्रसंचालन अशोक पारधे तर आभार संस्थेचे अध्यक्ष आर.डी.कोळी यांनी मानले. अशोक पारधे, गोविंद पाटील, मनोहर तेजवाणी, निवृत्तीनाथ कोळी यांनी परिश्रम घेतले. विजेत्यात प्रथम-एन.आर.पाटील (चाळीसगाव), व्दितीय- सुना पाटील (मुसळी), तृतिय- डॉ.सुषमा तायडे (जळगाव) यांचा समावेश होता.