सध्या सणांचा सिझन आहे. सणासुदीमध्ये पारंपारिक पेहरावा करण्यामध्ये महिलांचा कल असतो. पारंपारिक साडीला मॉर्डन टच द्यायचा असल्याचे तुम्ही नवीन नवीन प्रयोग करू शकता. क्रॉप, फ्रील, नेटेट, बांधणी, राजस्थानी किंवा क्रोशा वर्क असलेले टॉप साडीवर वेअर केल्यास अगदी हटके लूक येते.
साडी सगळ्याच सांस्कृतिक सोहळ्यात आवर्जून नेसली जाते. कोणत्याही कौटुंबिक सोहळ्यात, सणाच्या दिवशी वेगळे दिसण्याच्या प्रयत्नात अनेकजणी असतात. सर्व पेहरावाच्या तुलनेत महिला साडीमध्ये छान दिसतात, असे बोलले जाते ते काही चुकीचे नाही. साडीमध्ये महिलेचे सौंदर्य अजूनच खुलते. साडी विविध पद्धतीने वेअर केली तर साडीची पारंपारिकता जपून आधुनिकता सुद्धा आणता येते. एखाद्या समारंभाला साडी नेसण्याचा विचार असेल आणि त्यातही नवीन काहीतरी करायच असेल तर जिन्स व स्कर्टवरील टॉप चा पर्याय नक्कीच ट्राय करून पाहा.
ऑफ शोल्डर, फ्रिल हॅण्डच्या टॉप वर प्लेन साडी वेअर केल्यावर हटके लूक आल्याशिवाय राहणार नाही. क्रॉप, फ्रील, नेटेट, बांधणी, राजस्थानी किंवा क्रोशा वर्क असलेले वॉर्डरोबमधील विविध प्रकारचे टॉप तुम्ही साडीवर ब्लाउज म्हणून नव्याने वापरू शकता. टॉप पॅटर्न ब्लाउज घालताना तो साडीच्या रंगाशी मिळताजुळता आणि फिटिंगचा असावा, एवढी काळजी घेणे गरजेचे आहे. क्रॉप टॉप तुम्ही घालणार असल्यास साडी आणि ज्वेलरी आधुनिक डिझाइनची असल्याचे साडी उठून दिसते. तुम्हाला इस प्यार को क्या नाम दूं’ ही या आगामी मालिकेतील अभिनेत्री शिवानी तोमरला ला दिलेला लूक आठवतो का? तिलादेखिल असाच लूक देण्यात आला आहे.