साडेचार लाखांच्या लोखंडी प्लेटा लांबवणारे अखेर जाळ्यात

Iron plates worth four and a half lakhs from Marwad area are finally in the net जळगाव : पाडळसरे निम्प प्रकल्पातील सुमारे साडेचार लाखांच्या लोखंडी प्लेटा लांबवणार्‍या चौकडीला जळगावात पोलिसांनी अटक केली असून वाहनदेखील जप्त करण्यात आले आहे. गुरूवार, 29 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही कावाई करण्यात आली. संशयीतांना अधिक कारवाईसाठी मारवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गस्तीदरम्यान संशय आल्याने कारवाई
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गणेश पाटील आणि समाधान पाटील हे गुरुवार, 29 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता मानराज पार्क परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मानराज पार्कसमोरील राष्ट्रीय महामार्गावर (एम.एच.19 क्यू.4760) या वाहनात चौघांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या दिसून आल्या. त्यांनी वाहन थांबवून वाहनाची चौकशी केली. वाहनामध्ये ज्ञानेश्वर सोपान कोळी (27), मिथून निरामन गोसावी (36), लखन एकनाथ सपकाळे (30) आणि विष्णू श्रीधर कोळी (37, रा.शेळगाव, ता.जि.जळगाव) हे दिसून आले. त्यांची कसून चौकशी केली असता वाहनातील 17 लोखंडी प्लेटा अमळनेर तालुक्यातील मारवड येथून चोरून नेत असल्याची कबुली दिली.

यांनी केली कारवाई
जिल्हापेठ पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत याबाबत मारवड पोलिसात गुन्हा दाखल असल्याने त्यांना कारवाईसाठी मारवड पोलिसांच्या ताब्यात सोपवले. ही कारवाई जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, गणेश पाटील, समाधान पाटील, विनोद पाटील यांनी केली.