साडेचार वर्षात भाजपच्या काळात मारले गेले साडेसाहशे दहशतवादी

0

नवी दिल्ली-जम्मू-काश्मीर आणि दहशतवाद या विषयावरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये नेहमी वाकयुद्ध सुरु असते. एकमेकांवर या प्रश्नांवरून आरोप-प्रत्यारोप केले जाते. दरम्यान भाजपने सत्तेत आल्यापासून साडेचार वर्षात ६४६ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे असा दावा माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे. तर केवळ राजकारण करणाऱ्या कॉंग्रसच्या काळात दोन वर्षात फक्त १३९ दहशतवादी मारले गेले. यावरून युपीए आणि एनडीए सरकारच्या कामकाजाचा अंदाज येतो असा टोलाही त्यांनी कॉग्रेसला लगावला आहे. याबाबत ट्वीटरवर त्यांनी माहिती दिली आहे.

वर्ष निहाय माहिती

२०१२ मध्ये कॉंग्रेस सरकार असतांना ७२ दहशतवादी मारले त्यानंतर २०१३ मध्ये ६७, दरम्यान भाजप सरकार आल्यानंतर २०१४ मध्ये ११०, २०१५ मध्ये १०८, २०१६ मध्ये १५०, २०१७ मध्ये २१ आणि आता २०१८ मध्ये आज पर्यंत ७५ दहशतवादी मारले गेले आहे अशी माहिती रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे.