जिल्हाभरात 15 केंद्र ; 500 विद्यार्थ्यांची दांडी ; तपासणीने विद्यार्थ्यांना फोडला घाम
जळगाव- नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैदकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेलली ’नीट’ (नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट) ही परीक्षा रविवारी जिल्हाभरातील 15 केंद्रावर पार पडली. यात पाच हजारा विद्यार्थ्यांपैकी साडेचार हजार विद्यार्थी परिक्षेला हजर होते तर 500 विद्यार्थ्यांनी परिक्षेला दांडी मारली. दरम्यान केंद्रावर विद्यार्थ्यांच्या कसून करण्यात आलेल्या तपासणीने परिक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना घाम फोडला होता.
जिल्हाभरात जळगाव शहरात नीट परिक्षेसाठी 12 केंद्र, जामनेर, चाळीसगाव, व भुसावळ येथे प्रत्येकी एक केंद्र होते. केंद्रीय विद्यालयामार्फत या परिक्षा घेण्यात आल्या. शहरातील ओरिएन सीबीएससी स्कुल, मु.जे.विवेकानंद भवन, सेंट जोसेफ इंग्लीश स्कुलसह सर्वच केंद्रावर साडेअकरा वाजेपासुनच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. परीक्षार्थीची कसून तपासणी करुन सोडले जात होते. परीक्षेपुर्वी ’एनटीए’ने विविध सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. ऑफलाइन पद्धतीने होणार्या या परीक्षेत 180 बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक योग्य उत्तरास 4 गुण तर चुकीच्या उत्तरास -1 गुण (वजा एक गुण ) असे मूल्यमापन करण्यात येणार आहे
विद्यार्थ्यांचा निकाला घाम
विद्यार्थ्यांना पेन-पेन्सिल परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून दिली गेल्याने घरून पेन आणु नये. मुलांना बुटाऐवजी चप्पलची सक्ती, यासहित मुलांना हाफ शर्ट, अथवा टीशर्ट, कुर्ता पायजमी, लाईट कलरची जीन, मुलींना बटणरहीत कपडे अनिवार्य, यात स्लिवलेस कपडे, यात कपड्यांना कोणत्याही प्रकारची मोठी बटणे लावू नयेत. लो-हिल्सच्या चप्पल किंवा सॅण्डल्स बंधनकारक होते. कोणत्याही प्रकारचे लेखी साहित्य, जिऑमेट्री बॉक्स, पेन्सिल बॉक्स, प्लॅस्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, पेनड्राइव्ह, रबर, स्कॅनर, इलेक्ट्रीक पेन मोबाईल फोन, ब्लू-टूथ, इअरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बॅण्ड पाकीट, गॉगल, हॅण्डबॅग, पट्टा, टोपी एटीएम, क्रेडिट, डेबिट कार्ड, प्लॅस्टिक आयकार्ड कॅमेरा, धातूच्या वस्तू, पाण्याची बाटली यास बंदी होती. टल डिटेक्टरसह विविध अत्याधुनिक उपकरणांद्वारे संपुुर्ण शरीराची तपासणी केली जात होती. त्यामुळे परीक्षेआधीच विद्यार्थ्यांचा चांगलाच घाम निकाल्याचे चित्र दिसुन आले. तपासणीच्या या प्रक्रियेबाबत परीक्षार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली.