साडेतीन लाखांची कॉपर वायर व ऑईल लांबवले

शिरपूर : तालुक्यातील तांडे येथील टेक्सटाईल पार्कमध्ये असलेल्या महाकॉट फायबर कंपनीचे ट्रान्सफॉर्मरमधून रात्रीच्या सुमारास तीन लाख 28 हजार रुपये किंमतीची कॉपर वायर व पॉवर ऑईलची अज्ञातांनी चोरी केली. थाळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

थाळनेर पोलिसात गुन्हा
या प्रकरणी महाकॉट फायबर कंपनीचे मॅनेजर संतोष कौतिक पाटील रा.दहिवद ता.शिरपूर यांनी तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार तालुक्यातील तांडे शिवारात असलेल्या महाकॉट फायबर कंपनीच्या भिंतीला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधून 26 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 10 ते 27 फेब्रुवारी 2022 रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 88 हजार रुपये किमतीची 960 किलो वजनाच्या कॉपर वायर असलेल्या 3 कॉईल व 40 हजार रुपये किमतीचे 500 लिटर पॉवर ऑईल असे 3 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञातांनी संमती शिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरून नेली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दाखल तक्रारीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना बागुल करीत आहे.