साडेतीन वर्षानंतर गवसला सिध्देश्वरनगरातील डांबरीकरणाचा मुहूर्त

0

वरणगावकरांना दिलासा ; आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

भुसावळ- तब्बल साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या वरणगावातील सिद्धेश्‍वर नगरातील डांबरीकरणाचा प्रश्‍न अखेर मंगळवारी मार्गी लागल्यानंतर नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्याचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते मंगळवारी सकाळी 11 वाजता सिद्धेश्‍वर नगरात करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मन्यारखेडा ते तळवेल रस्त्याचे काम मंजूर झाले आहे.

यांची होती उपस्थिती
रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेढ, प्रतिभा चौधरी, अरुणा इंगळे, नगरसेवक गणेश धनगर, राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, सुधाकर जावळे, विकीन भंगाळे, कामगार नेते मिलिंद मेढे, समाधान चौधरी, साजीद कुरेशी, महेश सोनवणे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सकाराम माळी, बाळु माळी, यशवंत बढे, उमाकांत झांबरे, निलेश काळे, जितु मराठे, हर्षल वंजारी, संतोष पाटील, राजु माळी, पिंटू कोळी, धीरज ठाकुर, पंकज कोळी, गणेश माळी, गणेश पाटील, दगडू माळी, सविता माळी, कस्तुराबाई इंगळे, सिंधूबाई माळी, शोभाबाई कोळी, पदमा माळी, उषा मराठे, अनिता निकम, सुरेखा बावस्कर, सुमन पाटील, यशोदाबाई कोळी, मिराबाई भोई, शोभाबाई वंजारी, उषा माळी, छाया जोहरे, इंदूबाई माळी आदी नागरीक उपस्थित होते.