साड्या चोरताना पकडले

0
तळेगाव दाभाडे : दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत दुकानातील साड्यांवर डल्ला मारणार्‍या चांगल्या घरातील मायलेकींची चोरी दुकानातील  सीसी टीव्ही फुटेजमुळे त्वरित उघडकीस आली. तळेगाव दाभाडे बाजारात रुपेश मेहता यांच्या गोकुळ कलेक्शन या दुकानात बुधवारी हा प्रकार घडला. या मायलेकींनी तीन हजारपेक्षा जास्त किंमत असलेल्या सुमारे 15 साड्या चोरल्याचे निष्पन्न झाले. चोरी उघडकीस आल्यानंतर या मायलेकींनी साड्या परत करून चक्क कार्डद्वारे 45 हजार रुपये देण्याचेही कबुल केले. या घटनेमुळे व्यापार्‍यांनी सावधानता  बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.