नंदुरबार। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आयोजित केलेल्या नंदुरबार येथील सातपुडा विनामूल्य भव्य आरोग्य शिबिर अंतर्गत रुग्णांवरधुळे येथे शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. यापैकी एक नंदुरबार येथील दै.जनशक्तीचे पत्रकार रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी चव्हाण यांना मोठ्या प्रमाणावर पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास होता. त्यानुषंगीक संलग्न इतर पोटाच्या व्याधीमुळे त्या त्रस्त होत्या.
तत्काळ निर्णय घेवून रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
नंदुरबार येथील सातपुडा आरोग्य शिबिरात तपासणी झाल्यावर त्यांना शस्त्रक्रिया करण्याबाबत सांगितले होते.शिबिरातील शस्त्रक्रिया व उपचारधुळे येथील रुग्णालयात करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विविध आजारांचे रुग्ण धुळयातील शासकीय तसेच निरामय, सेवा, सुधा, सिध्देश्वर, देवरे आदी खासगी रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले आहेत.चव्हाण यांच्यावरील पित्ताशयातील खड्यांची शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून धुळे येथील सिद्धेश्वर रुग्णालयात डॉ. जितेन्द्र ठाकूर यांनी यशस्वीरीतीने केली आहे. शस्त्रक्रियेची तातडीने गरज लक्षात घेता महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे विशेष कार्याधिकारी संदीप जाधव व डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी तत्काळ निर्णय घेवून रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. सदर शस्त्रक्रिया धुळे येथील रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया ठरली असून त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत होणार आहे. शस्त्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. पाठक, विजय कासार,गणेश चित्ते आदींचे सहकार्य लाभले.