सातपुडा कारखान्यात 1 लाख साखर पोत्यांचे पुजन

0

शहादा । सातपुडा कारखाना हा अण्णांसाहेबांनी सहकार चळवळीतुन उभा केला आहे. पक्ष कोणताही असो सर्व आम्हांला सारखेच आहेत. एका पक्षाला घेऊन चाललो असतो तर कारखान्याचे कधीच वाटोळे झाले असते. जुन्या नवे संचालक, कार्यकर्ते व हितचिंतक यांच्यातील विचारांचा अदान- प्रदानाने निश्‍चित गत वभव प्राप्त करु, असा विश्‍वास कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांनी व्यक्त केला. श्री सातपुडा साखर कारखाना सन 2017-18 या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 1लाख 11 हजार 111 साखर पो्त्याचा पूजनाचा कार्यक्रम माजी आमदार संभाजी नाना यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धुळयाचे माजी जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर भामरे, नगिन पाटील, खरेदी विक्रिचे चेअरमन राजाराम पाटील, सुतगिरणीचे व्हा.चेअरमन रोहिदास पाटील, कृउबाचे चेअरमन सुनील पाटील, जि.प.समाज कल्याण सभापती आत्माराम बागले, कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग आहेर, माजी संचालक रोहिदास पाटील, धुळे कॉग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर, भाजपा धुळे बबन चधरी, रिपाइं अध्यक्ष अरविंद कुवर, कारखान्याचे माजी अध्यक्षा कमल पाटील, न.पा.उपनगराध्यक्षा रेखाबाई चधरी, पं.स. सदस्या वांगीबाई पावराने, माजी नगरसेविका रेशमबाई दुरंगी, पुरूषोत्तम नगरच्या सरपंच ज्योती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.