सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचा आज यात्रोत्सव

Satpura resident Mother Manudevi’s pilgrimage tomorrow यावल : सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचा यात्रोत्सव शनिवार, 27 रोजी साजरा होणार आहे. सालाबादाप्रमाणे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी हा यात्रोत्सव साजरा होतो मात्र कोरोना संकटात गेल्या दोन वर्षांपासून हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला मात्र यंदा कोरोना संकट नसल्याने त्यातच सध्या दमदार पाऊस झाल्याने येथे निर्सगरम्य वातावरणात दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे.

पिठोरी अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी येथे यात्रोत्सव
मंदिर व्यवस्थापनाकडून भाविकांना योग्य दर्शन घेता यावे म्हणून तयारी पूर्ण झाली असून पोलिस प्रशासनाकडून मंदिर परीसरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
आडगाव-कासारखेडा, ता.यावल जवळील सातपुड्याच्या कुशीत खान्देशाची कुलदैवत आई मनुदेवीचे मंदिर आहे. सातपुड्याच्या नटलेल्या वनराईत निर्सगरम्य वातारणात येथे शनिवारी येथे यात्रा आहे.

पिठोरी अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी यात्रोत्सव
दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी अर्थात पिठोरी अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी येथे यात्रा असते. या ठिकाणी यात्रानिमित्त दर्शनासाठी राज्यभरातून भाविकवर्ग येतात. नवस फेडणार्‍या भाविकांसाठी येथे सभा मंडपात व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील यांनी दिली.