सातपुडा पर्वत हिरवागार करण्यासाठी मोठ्या मोहिमेची गरज

0

नंदुरबार । आपला सातपुडा पर्वत पूर्ण हिरवागार करण्यासाठी आपल्याला फार मोठी मोहिम राबविण्याची गरज आहे यासाठी आपण जनजागृतीवर भर देत आहोत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे. जागतिक पर्यावरण दिन, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पर्यावरण सप्ताह, 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमानिमित्त आज जिल्हास्तरीय वृक्षदिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्री. कलशेट्टी बोलत होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिप उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, उपजिल्हाधिकारी आर.एच. सुलाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) अनिकेत पाटील, स्वच्छ भारत मिशनच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी सारीका बारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष नागरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, तहसिलदार नितीन पाटील, तालुका कृषि अधिकारी नरेंद्र महाले, वनविभागाच्या उपवनसंरक्षक पियुषा जगताप, मेवासी उपवनसंरक्षक अनिल थोरात, विभागीय वन अधिकारी सुरेश मोरे, सहाय्यक वनसंरक्षक रामकिसन जेजुरकर, एस.आर. चौधरी, पी.पी. सुर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त राकेश महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश गिरी, नगरसेवक कुणाल वसावे, राजेश रघुवंशी, मोहन माळी, गजेंद्र शिंपी, वनक्षेत्र अधिकारी जावेद शेख, वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, पोलीस निरिक्षक संदीप रणदिवे, लोकसमन्वय प्रतिष्ठानच्या प्रतिभा शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते वृक्षदींडी पुजन करण्यात आले. तालुका क्रीडा संकुल येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.