शहादा । परिसरातील शेतकरी पिळला जावु नये ताठ मानेने जगला पाहिजे त्याचा शेतमालाला चांगला भाव आला पाहिजे शेतकरी त्याचा हक्कापासुन वंचीत होवु नये म्हणून अण्णासाहेबानी सहकार तत्वावर कारखान्याची मुहूर्तमेढ केली होती. सातपुडा साखरकारखाना सभासदाचा मालकीचा आहे, आपणच केलेल्या चुकामुळे सर्वांना परिणाम भोगावा लागत आहे. बाहेरचा कारखान्याना ऊस देवुन स्वतःच्या पायावर कुर्हाड मारुन घेतली आहे, असे प्रतिपादन सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी केला. सातपुडा साखर कारखान्याची सर्व साधारण सभा आयोजीत करण्यात आली होती. त्यात दीपक पाटील बोलत होते.
जास्त उत्पन्न घेणार्या शेतकर्यांचा झाला सत्कार
प्रास्ताविक व सुत्रसंचालन कारखान्याचे संचालक पी.आर.पाटील यांनी केले तर अशोक पाटील यानी अहवाल वाचन केले. बोलतांना दीपक पाटील यांनी सांगितले की, कारखान्यात कर्मचारी अधिकारी प्रेमाने काम करीत आहे. आपण प्रेम द्या अफवांवर विश्वास ठेवु नका, आजपर्यंत शेतकर्यांचा, सभासदांचे उसाचे पैसे बुडू दिले नाही, शेतकर्यांचा कुठेही विश्वास घात होणार नाही, ज्यांचावर कारखाना सांभाळण्याची जबाबदारी आहे ते बाहेर उस देतात हे दुर्दैव आहे. सभासदांचा जोरावर लाचार न होता सरकार तत्वावर शहादा तालुक्यात सामराज्य निर्माण करणारे देशात एकमेव उदाहरण आहे. जे कमवले ते शेतकर्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला सस्था उभारणे कठीण असते.
शेती उपयोगी औषधीच्या दुकानाचा शुभारंभ
सभेनंतर एकरी जास्त उसाचे उत्पन्न घेणार्या सभासदांचा चेअरमन दीपक पाटील यांनी सत्कार केला. यात गोपाल पाटील, शांतीलाल पाटील, साहेबराव चव्हाण प्रतापपुर पावरा, बोरद बुलाखी पाटील, गोविंद पाटील, आमलाड पाटील, अवघे पवार, विजय माळी, धनपुर पाटील, म्हसावद कालुसिंग भिल, अमोदा प्रमिला आहेर, प्रशांत पाटील, सुनिल जयस्वाल, ज्योतीबाई पाटील पाडळदा, तुमडू पाटील, हेमराज पाटील म्हसावद, महेंद्र चौधरी चिनोदा या शेतकर्यांचा समावेश होता. दरम्यान सभेचा सुरुवातीला खरेदी विक्री संघात सुरु करण्यात आलेल्या शेती उपयोगी औषधाचा दुकानाचा दिपक पाटील यांच्याहस्ते शुभारंभ
करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी श्रीमती कमलताई पाटील नगीन काळु पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रेमसिंग आहेर, दुधसघाचे चेअरमन राजाराम पाटील, शहादा तालुका देखरेख संघाचे चेअरमन रतिलाल चौधरी, जि.प. समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, रामदास पाटील, माधव पाटील, नगरसेवक मकरंद पाटील, सरपंच ज्योती पाटील, सहसंचालक सभासद यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.