सातपुडा साखर कारखान्याचे गाळप 4 लाख टन

0

कार्यकारी संचालक पी. आर. पाटलांची माहिती

शहादा । तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथील सातपुडा सह.साखर कारखान्याने 1एप्रिलपर्यंत 4लाख टन उसाचे गाळप केल्याची माहिती कार्यकारी संचालक पी.आर.पाटील यांनी दिली. गेल्यावर्षी अडीच लाख टन उसाचे गाळप झाले होते. यावर्षी कारखाना एप्रिल महिन्यांचा शेवटच्या आठवड्या पर्यंत सुरु राहील म्हणजे पाच लाख टनापर्यंत उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. यावर्षी उस लागवडीचे प्रमाण अधिक असल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. बारा लाख टना पेक्षा जास्त उस गाळप होइल असा अंदाज आहे. 1977 साली जसे वैभव कारखान्याचे होते ते परत मिळणार आहे. कारखाना आता प्रगतीचा मार्गावर आहे उस तोड कामगार ही भविष्यात जास्त लागतील. 2400रु . टनाप्रमाणे उसाला भाव दिल्याने शिवाय उसाचे पेमेंट वेळेवर मिळत असल्याने शेतकर्‍यांचा व उस उत्पादक सभासदांचा विश्‍वास निर्माण झाला आहे.

सभासदांव्दारे उसाच्या लागवडीत वाढ
उस उत्पादकांचा असलेला विश्‍वास व् त्यांनी घेतलेली मेहनत महत्वाची आहे. सभासद आता मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करीत आहे. उस लागवड व् उत्पादनाबाबत तज्ञ मार्गदर्शक शेतकर्‍यांना माहिती देतात. कारखाना सभासदांचा मालकीचा आहे. कारखान्याचा विकास म्हणजे तालुक्याची प्रगती होईल अशी माहीती चार लाख टन उस गाळप झाल्या नंतर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांनी दिली. कार्यकारी संचालक पी.आर.पाटील यांचे देखील बहूमोल योगदान आहे.