सातपुडा साखर कारखान्याने ठेवलेले उद्दिष्ट कौतुकास्पद-जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी

0

शहादा-प्रत्येकाला पाण्याचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. कारखान्याने पाणी बचत बाबत नियोजन करावे, पाण्याचा उद्भवलेल्या परिस्थितीवर विचार करावा लागणार आहे शेतकऱ्यांनी ठिबक पाणी सिंचन योजनेवर भर द्यावा. जिल्ह्याला अभिमान वाटावे असे साडेसहा लाख टन ऊस गाळप क्षमतेची उद्दिष्ट सातपुडा साखर कारखान्याने ठेवलेले आहे हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी केले.

आज सातपुडा साखरकारखान्याचा बॉयलर अग्नि प्रतिपन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी बोलत होते. यावेळी चेअरमन दिपक पाटील, व्हा.चेअरमन प्रेमसिंग आहेर, उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, प्रतिभा पाटील, कमलताई पाटील, माजी सस्थापक संचालक रोहिदास पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मिकांत साताळकर, नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, पोलीस निरिक्षक संजय शुक्ल, सुनिल पाटील, रविंद्र रावळ, सुतगिरणीचे व्हा.चेअरमन रोहिदास पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ कलाल, प्रा.,लियाकत अली, हैदर नुरानी, सरपंच ज्योती पाटील, जयश्री पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. शेतकरी विविध सेवा भावी सस्था व प्रशासनाने भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईला सामोरे जावे. आपल्या जिल्ह्यातला चारा परप्रांतात जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. जनावरांसाठी चार्याचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. प्रत्येक गावातील लोकांचा सहभाग आवश्यक आहे . उस या पिकाला पाणी जास्त लागते म्हणून त्याचे नियोजन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

चेअरमन दिपक पाटील यांनी असंख्य अडचणीवर मात करुन कारखाना सुरळीत सुरु आहे याचे श्रेय सभासद व कर्मचाऱ्यांना जाते. साखर कारखान्याचा गतवैभव प्राप्त होणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व सुत्रसंचलन कार्यकारी संचालक पी.आर.पाटील यांनी केले.

गेल्यावर्षी साडेचार लाख टण ऊस गाळप झाला होता. यावर्षी साडेसहा लाख टण उस गाळप करण्याचे उद्दीष्ट आहे. ९.८८ साखर उतारा होता. २० हजार एकर उसाची लागवड झाली आहे. ४ हजार ३८५ उस कामगारांची नोंद झाली आहे. उसाची वाहतुक करण्यासाठी टायर असलेल्या २०० बैलगाड्या ५०० ट्रॅक्टर , ८७ ट्रका नोंद केल्या आहेत. ग्रामीण भागात कृषी तज्ञांचे ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे चर्चासत्र घेतले होते. सातपुडा कामगार पतसंस्थेतर्फे १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश जलयुक्त शिवार कामासाठी पी.के.अण्णा फाऊंडेशनला देण्यात आला.