आमदार हरीभाऊ जावळेंनी दिले निवेदन : केळी बागांमुळे पाण्याची गरज
फैजपूर- जिल्ह्यातील रावेरसह, यावल चोपडा हे तालुके सातपुडा पायथ्याच्या तळाशी येतात मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या भागात दरवर्षी पर्जन्यमान अवघे 400 ते 500 मिलीमीटर होत आहे. या भागात कृत्रिम पाऊस पाडल्यास केळी बागायतदारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आमदार हरीभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. 1980-85 दरम्यान या भागात हजार-बाराशे मिलीमीटर पाऊस होत होता मात्र आता पर्जन्यमान घटले आहे. हा परीसर बझाडा झोनचा असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीत जिरते. कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्यात आल्यास या भागात केळी बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा आशावाद पत्राद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.