यावल- तालुक्यातील सातपुडा जंगलात बेशुमार मौल्यवान वृक्षांची तस्करांकडुन वृक्षतोड होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या वन संरक्षकांवर हल्ला करण्यात आल्यने एक वन कर्मचारी जखमी झाला. या प्रकरणी यावल पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 15 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास लंगडा आंबा उसमळी वनकक्ष 122 नियत क्षेत्रातील लगंडा आंबा नं .1, उसमळी गावा जवळ जंगलात काही इसम झाडे कापत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी सेवेत कार्यरत असलेले वनसंरक्षक ललित रामदास सोनार (50) हे कर्मचार्यांसह गेल्यानंतर आरोपी किसन डोंगरसिंग भिलाला, रावलसिंग किसन भिलाला व राकेश भिलाला (सर्व राहणार उसमळी, ता. यावल) यांनी शासकीय कामात अडथळा करून ड्युटीवर कार्यरत असलेल्या वनसंरक्षाकाच्या अंगावर धावुन आले व त्यांच्या जवळील एसएलआर रायफल हिसकाण्याचा प्रयत्न केला व धक्काबुक्की करून शासकीय कामात व्यत्य आणला. यावेळी वनमजुरांनी वनातील जंगलातील झाड तोडणार्यास पकडुन ठेवलेल्यांना राकेश भिलाला याने घटना स्थळावरून पळवले तर या घटनेत वनसंरक्षक ललितत सोनार यांच्या डाव्या हाताच्या बोटास मार लागुन दुखापत झाली. या संदर्भात वनसंरक्षक ललित रामदास सोनार यांनी यावल पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलित करीत आहेत.