बोदवड । शहरातील मटण मार्केट भागातील रहिवासी व सातवीत शिक्षण घेणार्या 13 वर्षीय विद्यार्थिनीने पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याने गावात खळबळ उडाली. मनीषा प्रकाश शिराळे (13) असे मयत तरुणीचे नाव आहे. याबाबत संजय बोदडे यांनी बोदवड पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मयत मनीषाचे वडील प्रकाश हे बॅण्डमध्ये काम करतात तर आई सुनंदा गृहिणी आहेत. मनीषाच्या पश्चात चार बहिणी, आई, वडील असा परिवार आहे.