भुसावळ। एसटी महामंडळाच्या भुसावळ आगारात शुक्रवार 26 व शनिवार 27 रोजी 7वे वेतन आयेाग मिळण्यासाठीच्या संप करण्याबाबत मतदान प्रक्रिया सुरु झाली. राज्य परिवहन कर्मचार्यांचे वेतन इतर क्षेत्रातील महामंडळ व राज्य सरकारी कर्मचार्यांपेक्षा तुलनेत अत्यंत कमी असल्याने राज्य शासकीय कर्मचाप्रमाणे पदनिहाय वेतन श्रेण्यांसह 7वा वेतन आयोग मिळावा व महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या प्रमुख मागण्या मंजूर होण्यासाठी मान्यताप्राप्त कामगार संघटनेने शासनाला कायदेशिर मत एकत्रित करण्यासाठी मतदान प्रक्रिया शुक्रवार 26 रोजी सुरु केली.
ही प्रक्रिया दोन दिवस चालणार असून भुसावळ आगारात याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये मान्यताप्राप्त कामगार संघटनेने इतर संघटनांना लेखी पत्र देवून या संघास पाठींबा देण्यासाठी तीव्र लढा देण्याची गरज असल्याचे बैठकीत ठरले. त्याअनुषंगाने महाराष्ट्र एस.टी. कामगार काँग्रेस, कनिष्ठ कर्मचारी संघटना, संघर्ष गृप, विदर्भ एस.टी. कामगार संघटना यांनी एकत्र लढा देण्याचे मान्य केले व विसंवादाकडून सुसंवादाकडे वाटचाल व्हावी म्हणून एसटी कामगार संघटना मान्यतप्राप्त असूनही काही मतभेद बाजुला ठेवून राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन मिळावे म्हणून लढा सुरु केला आहे. त्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापित करण्यात आली व मागण्यांच्या पुर्ततेसाठी कायद्याप्रमाणे संपाची प्रक्रिया सुरु करण्यात त्याचा पहिला टप्पा म्हणजे संपाच्या बाजुने मतदान प्रक्रिया करणे आहे.