सातव्या वेतन आयोगासाठी महापालिकेत समिती गठीत करा

0
पिंपरी चिंचवड : महापालिकेतील शासनाच्या प्रशासकीय कर्मचार्‍यांना सातवा वेतणश्रेणी आयोग लागू करण्यात यावा. त्यासाठी समिती गठीत करून त्या संबंधीत ठरावाला सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने केली आहे.
यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 1 जानेवारी 2016 पासून राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा मंत्रीमंडळामध्ये झाली. विविध पदांना वेतनश्रेणी निश्‍चित करण्यासाठी प्रशासन, लेखा, मुख्य लेखा परिक्षण, कामगार कल्याण, कायदा आणि कर्मचारी महासंघ आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची समिती गठीत करावी. यासंबंधीत विषय महासभेपुढे ठेवून मंजुरी घ्यावी, अशी मागणी झिंझुर्डे यांनी केली आहे.