भुसावळ : समाजातील युवक -युवतींनी इंजिनिअर, डॉक्टर बनण्यापेक्षा स्पर्धात्मक परीक्षा देऊन उच्चपदस्य नोकर्या मिळवाव्या किंवा व्यवसायात निपुनता दाखवावी. तसेच बदलत्या काळानुरुप समाज बदलण्याची आवश्यकता आहे. समाजातील नेते व पदाधिकार्यांनी पक्षांचे काम जरुर करावे मात्र त्यांची गुलामी न करण्याचे आवहन कार्यक्रमाचेे अध्यक्ष नागपूरचे अविनाश ठाकरे(क्रांतीसूर्य महात्मा फुले फोरम ऑफ सोशियो कमर्शियल ऍण्ड इंडस्ट्रियल ऍक्टीव्हीटीचे संयोजक) यांनी केले. संत सावता माळी शिक्षण मंडळातर्फे माळी भवनात रविवार 11 रोजी आयोजित दुसरा वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षिय भाषणात बोलत होते.
यावेळी मंचावर धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, माजी आ. हरीभाऊ महाजन, एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, माजी. जि.प सदस्य वसंत महाजन, खांदेश माळी महासंघाचे संतोष इंगळे, रावेरचे माजी उपनगराध्यक्ष पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, डॉ. नलिन महाजन,एरंडोलचे विजय महाजन, जामनेर नगरसेवक उत्तम पवार, नगरसेवक छगन झाल्टे, रावेर भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, संतोष माळी (वरणगाव)उपस्थित होते. मान्यवारांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत सावता माळी, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमानना माल्यार्पन करुन कार्यक्रामाची सुरुवात झाली. मान्यवरांचे आयोजनकांतर्फे स्वागत व सत्कार झाले.
पहिल्यांदाच झाले असे आयोजन
प्रास्ताविक वधू-वर परिचय संमिती अध्यक्ष गजेंद्र महाजन यांनी केले. दरम्यान, यावेळी ठाकरे यांनी, दलित समाजांच्या मोर्चातील संख्या कमी असते मात्र डॉ. बाबासाहेबांचा अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी व दिक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येने समाज बांधव एकत्र येतात त्यांचा आदर्श घेऊनही संपूर्ण माळी समाजाने पूणे येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भिडे वाडा येथे जयंती व पुण्यतिथीनिमित्त का उपस्थित राहत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्ञानेश्वर महाजन यांनी आपल्या मनोगतात, जिल्ह्यात समाज बांधवांची संख्या मोठी आहे. मात्र असे जिल्हास्तरावरही आयोजन होत नाही असे आयोजन भुसावळात होते. या मेळाव्यात राज्यासह इतरही राज्यातील समाजबांधव सहभागी होतात. राज्यात समाजाचा कोठेही नाही ऐवढा प्रशस्त सभागृह येथे आहे. संस्थेचे अध्यक्ष कैलास महाजन व त्यांचे सहकार्यांचे कौतूक केले.
महाजनांचे आयोजन
विनोद चौधरी यांनी, या मेळाव्याचे हे दुसरे वर्ष असतानाही मेळाव्याची चर्चा मध्यप्रदेशात होते. येथील मेळाव्याप्रामणेच मध्यप्रदेशात ही समाज बांधवांसाठी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचा आमचा मानस असल्याचे सांगितले. कैलास महाजन यांनी, कार्यकर्त्यांमुळे आयोजन यशस्वी झाले आहे. मेळाव्यात महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, राजस्थान व गुजरात राज्यातील वधु-वरांनी सहभाग नोंदविला आहे. कमी वेळाच आकर्षक छपाई करुन वधु-वर सुची प्रकाशीत केली आहे. तरी यात तांत्रीक अडचणी लक्षात घेऊन समाज बांधवांनी या सहकार्य करण्याचे आवाहन केले. मेळाव्यात 698 युवक-युवतीयांनी परिचय दिला. यात 355 युवती व 344 युवकांनी परिचय दिला.युवतींनी अनुरुप व नोकरी करण्यार्या वरास व युवकांनी सुशिक्षीत व अनुरुप वधून पसंती दर्शविली.
यांनी घेतले परिश्रम
मेळाव्यात इंदौर, नागपूर, मुंबई, अमरावती, बडोदा, राजकोट, भोपाळ, शहापूर इच्छापूर येथील समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभदा नेवे यांनी तर आभार धनंजय महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी संत सावता माळी शिक्षण मंडळाचे प्रशांत महाजन, ईश्वर चौधरी, योगेश महाजन, राजेंद्र माळी, दिलीप माळी, रमेश महाजन, दशरथ सोनवणे, सुरेश महाजन, सुधाकर महाजन,कैलास बंड, वसंत वेरूळकर, रामकृष्ण माळी, धनंजय महाजन, देवराम महाजन, वामन मावळकर यांनी परिश्रम घेतले.