भोर : पुणे-सातारा रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, ही उड्डाणपुलांची कामे लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी ही कामे तीन वेगवेगळ्या उपकंपन्यांना देण्यात आली आहेत. त्यानुसार उड्डाणपुलांच्याकामाचा वेग वाढला आहे. एप्रिल अखेरपर्यंत प्रलंबित उड्डाणपुलांची सुमारे 90 टक्के कामे पूर्ण होतील, असे रिलायन्स इन्फ्राच्या अधिकार्यांनी सांगितले.
पुणे-सातारा रस्त्यावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या कामांमुळे पुणे-सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
एप्रिलपर्यंत काम पूर्ण होणार!
उड्डाणपुलांची कामे एकाच कंपनीकडे असल्यास ती पूर्ण होण्यास खूप कालावधी लागू शकतो. हे लक्षात घेऊन पुणे आणि खेड-शिवापूर परिसरातील प्रलंबित उड्डाणपुलांची कामे तीन वेगवेगळ्या उपकंपन्यांना दिली आहेत. एप्रिल अखेरपर्यंत उड्डाणपुलांची कामे 90 टक्के पूर्ण होतील, असे पुणे-सातारा टोल रोडचे महाव्यवस्थापक अमित भाटिया यांनी सांगितले.